Posts

Featured Post

अमृतकुंड - War Redefine भाग ३ - लक्ष्यभेद

Image
प्रस्तावना अमृतकुंड ही रामायणाच्या काही ठळक घटनांवर आधारलेली  कथांची एक मालिका आहे. हा या मालिकेचा तिसरा भाग आहे. जर तुम्ही या मालिकेचे आधीचे भाग वाचले नसतील तर वाचकांना माझी आग्रहाची विनंती आहे की त्यांनी आधीचे भाग नक्की वाचावे आणि मगच पुढचे भाग वाचावे. अमृतकुंडच्या या भागात कुंभकर्ण कोण होता आणि तो कसा वाधला गेला याची काही ठळक माहिती आणि युद्धचित्रे रंगवण्याचा प्रयत्न करतोय आशा करतो तुम्हाला तो नक्कीच आवडेल. *** युद्ध सुरू होऊन दोन प्रहर निघून गेले होते. वानर आणि राक्षसांमध्ये घनघोर युद्ध जुंपल होतं.  रक्ताच्या थारोळ्या आणि धूळधाण उधळत राक्षस आणि वानर त्वेषाने लढत होते. राक्षसांकडे आकाशसेना, भुमीसेना आणि मायासेना असल्याने त्यांना युद्धात बरीच मदत होत होती. आकाशसेनेचे राक्षस वानरांना आकाशात नेऊन कित्येक योजन खाली फेकून देत होते. झाडांच्या मुळासारखी दिसणारी भुमीसेना जमिनीतुन कुठेही निघुन वानरांना जखडुन ठेऊत होती. पण राक्षसांकडे वानरांसारखी चपळता, शिस्तबद्धता आणि संख्याबळ नव्हते. आणि वानरसेनेत बरेच मायावी योद्धे असल्यामुळे राक्षसांची बाजु कुठेतरी कमकुवत भास